Rajmata Jijabai Death Anniversary 2020 Images: महाराष्ट्रातील उत्तम शासक, करारी, कर्तव्यनिष्ठ आणि तितक्याच दयाळू महिलांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ. आज (17 जून) राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची पुण्यतिथी (Death Anniversary) सर्वत्र साजरी होत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात जिजाऊंचा महत्त्वाचा वाटा आहे. जिजामाताचे माहेर बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड (Sindkhed) येथील होते. जिजामाताचा विवाह 1605 साली शहाजीराजांसोबत दौलताबाद येथे झाला. जिजाऊंनी 1630 मध्ये शुर-वीर छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला. शिवरायांची संपुर्ण जवाबदारी जिजाऊंनी स्वतः उचलली.
जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार करत त्यांना कर्तव्याबरोबरच राजनितीही शिकवली. न्यायाचे समान वाटप आणि अपराध करणाऱ्याला कठोरात-कठोर शासन करणं, हे संस्कारदेखील जिजाऊंनी शिवाजी महारांजांवर बिंबवले. आज राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images शेअर करून जिजाऊंना विनम्र अभिवादन करा! (हेही वाचा - Jijabai Death Anniversary 2020: राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी)
राजमाता जिजाऊ मांसाहेबांना आदरांजली
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजाऊंनी 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला. जिजाऊंनी शिवराजांना लहापणापासून शूर वीरांच्या गोष्टी सांगून राजकीय धडे दिले होते. हिंदवी स्वराची स्थापना करण्यासाठी शिवरायांना या धड्यांचा उपयोग झाला.