पंजाब पोलिसांनी कारवाई करत पंजाब काँग्रेसचे नेते सुखपाल सिंह खैरा यांना ताब्यात घेतले आहे. सन 2015 मधील एका प्रकरणात एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. स्वत: खैरा यांनी फेसबुक व्हिडिओ द्वारे ही माहिती दिली आहे. ज्याचा उल्लेख वृत्तसंस्था एएनआयनेही आपल्या X हँडलवर केला आहे.

दरम्यान, या कारवाईवरुन पंजाब काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी म्हटले आहे की, काँग्रेस नेत्याची (सुखपाल सिंह खैरा) झालेली अटक म्हणजे विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी पंजाब सरकारने आखलेला हा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाचकांच्या माहितीसाठी असे की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि हीच आम आदमी पार्टी विरोधकांची राष्ट्रीय आघाडी एनडीएची घटक पक्षही आहे. ज्यात काँग्रेसची मोठी भूमिका आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)