बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू अधिक तिव्र होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काही आपत्कालीन स्थितीत उद्भवलीच तर उपाययजना हव्यात. यासाठी संबंधित राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिपरजॉय चक्रीवादळ अधिक गांभीर्याने घेतले आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 जून) दुपारी एकच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीत बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भात आढावा घेतला जाईल, असे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त)
ट्विट
Prime Minister Narendra Modi to hold a meeting to review the situation related to Cyclone Biparjoy at 1pm today: Sources pic.twitter.com/1yn90tlnD1
— ANI (@ANI) June 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)