Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त
Cyclone (Photo Credits: Pixabay)

चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) तीव्र झाले असून अधिक रौद्र रुप धारण करत (Extremely Severe Cyclonic Storm) असल्याचे वृत्त आहे. ज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात (Gujarat) समुद्र किनारपट्टीवर संकेत मिळत आहे. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर आज (12 जून) उंचच उंच लाटा (High Tidal Waves Were Seen at Tithal Beach in Gujarat) पाहायला मिळत आहेत. तर वादळामुळे पाकिस्तानमध्ये भूस्कलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवेची गुणवत्ता खालावली, दृश्यमानतेवर परिणाम

हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारी रात्री पाऊस झाला. मुंबई शहर तसेच राज्याच्या किनारपट्टीच्या भागातही जोरदार वारे वाहू लागले कारण बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने राज्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याचेही ते पुढे म्हणाले. वेगवान वारे आणि धुलीकण यांमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच, दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. (हेही वाचा, High Tide Timings in Mumbai Today: बिपरजॉय चक्रीवादळ शक्तीशाली; पहा मुंबईतील आजच्या भरती-ओहोटी च्या वेळा)

व्हिडिओ

रत्नागिरीत पर्यटक घाबरले

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे शहरात समुद्री लाटांमुळे पर्यटक काहीसे घाबरुन गेले. समुद्राच्या तीव्र लाटा किनाऱ्यावर आदळल्याने पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. काहींनी सुरक्षेसाठी सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली. या वेळी पर्यटकांची काहीशी धावपळ उडाली. दरम्यान, या प्रकारात कोणासही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

व्हिडिओ

चक्रीवादळ तीव्र

दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ बिपरजॉय, गेल्या सहा तासांत 8 किमी प्रतितास वेगाने उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. आज त्याची उत्तर-ईशान्य दिशेने वाटचाल सुरु राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळी चक्रीवादळाची तीव्रता "अत्यंत तीव्र चक्री वादळ" मध्ये बदलली.

गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीवरही वेगवान हालचाली

भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेश तसेच पाकिस्तानच्या लगतच्या किनारपट्टीला ओलांडण्याचा अंदाज आहे.