POCSO Offence: केरळ हायकोर्टाने अलीकडेच एक निर्णय देताना म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीने आपले धोतर वर करणे, आपले लिंग एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला दाखवणे आणि त्या मुलाला लिंगाचे माप घेण्यास सांगणे, प्रथमदर्शनी हा अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ आहे. हे कृत्य लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम (POCSO) च्या कलम 11 अंतर्गत दंडनीय आहे. न्यायमूर्ती ए बद्रुद्दीन यांनी असेही म्हटले आहे की, अल्पवयीन व्यक्तीसोबत अशा कृती प्रथमदर्शनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 509 अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरतील, जे शब्द, हावभाव किंवा कृतींद्वारे महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेल्या कृत्यांशी संबंधित आहे.

न्यायालयाने म्हटले, ‘आपले प्रायव्हेट पार्टस दाखवण्यासाठी आपले धोतर वर करणे आणि नंतर पीडितेला आपले लिंग मोजण्यास सांगणे, हे गंभीर आरोप आहेत.’ एका मुलीसोबत असे कृत्य घडले होते, त्यानंतर तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली. या खटल्यातून मुक्तता मिळावी यासाठी आरोपीने पेरुम्बावूर येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ती फेटाळण्यात आली. नंतर त्याने केरळ हायकोर्टात धाव घेतली. या ठिकाणीही त्याची याचिका फेटाळली गेली. (हेही वाचा: West Bangal Gangrape: पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 जणांनी केला सामुहिक बलात्कार, व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर केले पोस्ट)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)