चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. मात्र आज त्यांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण थेट पाहिले. त्यानंतर त्यांनी या ऐतिहासिक क्षणाबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्व देशवासीयांना संबोधित केले. चांद्रयान-3 चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा संपूर्ण भाररामध्ये आनंदाची लाट पसरली. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन केला. यावेळी त्यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांच्या अभिनंदन केले. (हेही वाचा: Chandrayaan 3 Lands Successfully on Moon: भारतासाठी ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO च्या प्रयत्नांना मोठे यश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)