पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पीएम मोदींनी मंगळवारी (2 मे) कलबुर्गी येथे काही लहान मुलांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी गप्पा-गोष्टी केल्या, चेष्टा-मस्करी केली. पीएम मोदींनी मुलांना बोटांनी अनेक आकार बनवण्यास सांगितले, जे मुलांनी केले आणि दाखवले. यानंतर पीएम मोदींनी मुलांना विचारले की, तुम्हाला काय बनायचे आहे? यावर एका मुलाने उत्तर दिले की, मला डॉक्टर व्हायचे आहे तर दुसऱ्या मुलाने सांगितले की, त्याला पोलीस व्हायचे आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा: आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI आणि Coding; लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमात होणार समाविष्ट)
#WATCH | Karnataka: Prime Minister Narendra Modi had a light-hearted interaction with children in Kalaburagi earlier today, before the roadshow here. pic.twitter.com/HYOoei56xf
— ANI (@ANI) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)