Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भाषेचा वाद पेटला आहे. दोन्ही राज्यांनी एकमेकांना जाणारी बससेवा बंद केली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस कंडक्टर महादेव हुक्केरी यांच्यावर शुक्रवारी बेळगावमध्ये हल्ला करण्यात आला. कर्नाटकातील चित्रदुर्गात महाराष्ट्रातील बस चालकावर हल्ला करून त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले. आता महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणारी बस सेवा बंद (Maharashtra-Karnataka Bus Service Suspended) करण्यात आली आहे. तथापी, आता कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सार्वजनिक वाहतूक वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्यांवर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)