भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. यवतमाळच्या पुसदमध्ये ही घटना घडली. भाषणादरम्यान भाजप नेते नितीन गडकरी यांना भोवळ आल्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. यानंतर गडकरींनी विश्रांती घेतली आणि त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. शिवसेनेच्या राजश्री पाटील या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत.
पाहा व्हिडिओ -
Nitin Gadkari's health took a hit during the election campaign in Yavatmal, Maharashtra, due to excessive heat. Thankfully, he's doing well now. pic.twitter.com/fLjq3kOnkX
— Political Kida (@PoliticalKida) April 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)