सिद्धू म्हणाले की, “शेतकऱ्यांचे एमएसपी किंवा उत्पन्न दुप्पट करणे” हे “जगातील सर्वात मोठे खोटे” आहे, असे काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद रविवारी घेतली या वेळी ते बोल होते. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख राहिलेल्या सिद्धू यांनी मोदी सरकारवर काव्यात्मक पद्धतीने टीका केली. सिद्धू यांनी म्हटले की, सरकार 40 रुपये वाढवते आणि 400 रुपये परत घेते. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देत ते म्हणाले, "मला तुम्हाला सांगायचे आहे की देशात जेव्हाही कृषी क्रांती झाली आहे, ती पंजाब-हरियाणामधूनच उदयास आली आहे". (हेही वाचा, Navjot Singh Sidhu Released: 10 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले नवज्योत सिद्धू; म्हणाले, 'लोकशाही बेड्यांमध्ये आहे')
व्हिडिओ
VIDEO | Here's what Congress leader Navjot Singh Sidhu (@sherryontopp) said about farmers' protest at a press conference in Patiala, Punjab.
"'Farmers' income will double', there isn't any bigger illusion than this. I want to confirm this with facts and figures. In the last 10… pic.twitter.com/U8fAjdE2uR
— Press Trust of India (@PTI_News) February 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)