लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसने मुंबईमध्ये मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर आज आंदोलन केले. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुंबई काँग्रेसचे प्रमुख भाई जगताप उपस्थित होते.

काल उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमापूर्वी लखीमपूर खेरीच्या बनबीरपूरमध्ये मोठा गदारोळ माजला. टिकुनियामध्ये उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे असलेले शेतकरी व भाजप नेत्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)