Mizoram Elections 2023 Counting Date: मिझोरम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. आयोगाने म्हटले आहे की मतमोजणीची तारीख 3 डिसेंबर 2023 (रविवार) वरून ती 4 डिसेंबर 2023 (सोमवार) अशी सुधारित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांसह मिझोराममध्ये 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. आता मिझोरामच्या संदर्भात ही तारीख एक दिवस पुढे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, मिझोरमच्या लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व आहे. या कारणास्तव तारीख बदलण्यात आली आहे. अनेकांनी तारीख बदलण्यास सांगितले होते. मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. यावेळी राज्यात एकूण 174 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. येथील सर्व 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. (हेही वाचा: Polls Of Poll: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे एक्झीट पोल्स निकाल घ्या जाणून)

मिझोरम विधानसभा निवडणूक मतमोजणी तारीख- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)