Men on Scooter, Bike Crash Into McLaren Supercar in Bengaluru: भारतात सुपरकार दिसणे हे फारसे सामान्य नाही. म्हणूनच, जेव्हा कोट्यावधी किमतीची सुपरकार शहरात नजरेस पडते तेव्हा तिला पाहण्यासाठी लोक उत्साहित होतात. मात्र, ही बाब अशा कार मालकांसाठी अडचणीची ठरू शकते. अलीकडेच, बंगळुरू शहरात एका मॅकलरेन सुपरकारचा एका स्कूटरसोबत अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मॅकलरेन आणि स्कूटर अपघाताचा व्हिडिओ विहान रामचंद्र यांच्या सौजन्याने इन्स्टाग्रामवर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बेंगळूरूच्या रस्त्यावरून कोट्यावधी रुपयांची मॅक्लारेन 765 LT सुपरकार धावत आहे. या कारला पाहण्यासाठी रस्त्यावर बरीच गर्दी झाली आहे. एक व्यक्ती रील्ससाठी या कारचा व्हिडिओ बनवत आहे. इतक्याच अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्कूटरची धडक या कारला बसते. या धडकेनंतर सुपरकार तशीच पुढे जाते, मात्र स्कूटरवरील दोघेही खाली पडतात.  सुदैवाने यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र कारचे काही नुकसान झाले आहे की नाही हे समजू शकले नाही. हा व्हिडिओ बेंगळुरू शहरातील विठ्ठल मल्ल्या रोडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Viral Video: काश्मीरच्या बर्फाळ रस्त्यावर धावणारा टांगा पाहून लोकांनी केली स्वर्गाशी तुलना, पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)