मंगळवारी (1 नोव्हेंबर 2023) घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. या प्रकरणात एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या पत्नीची आपण घर जावई म्हणून राहावे अशी इच्छा आहे, तसेच ती आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार देत असल्याचे सांगून, पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. अशा परिस्थितीत 'पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यास नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता', असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, जेव्हा एका जोडीदाराने दीर्घ कालावधीसाठी जाणूनबुजून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असेल तरच ती क्रूरता मानली जाऊ शकते. या प्रकरणात असे नाही, त्यामुळे न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने पतीच्या बाजूने दिलेला निर्णय फेटाळला ज्यामध्ये दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली होती. (हेही वाचा: 'सासरी पत्नीला पतीच्या अटींवर राहण्यासाठी खाजगी मालमत्ता किंवा बंदी कामगारासारखे वागवले जाऊ शकत नाही'- Chhattisgarh HC)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)