Hathras Stampede Incident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या तिसऱ्या दिवशी आज (गुरुवार) सहा जणांना अटक करण्यात आली. अलिगडचे आयजी रेंज शलभ माथूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, अटक करण्यात आलेले सहा आरोपी हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्य आयोजक प्रकाश मधुकरवर अजूनही फरार असून, त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माथूर म्हणाले, पोलीस लवकरच मधुकरविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करणार आहेत. गरज पडल्यास बाबाचीही चौकशी केली जाईल. चौकशीनंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. हे आरोपी सेवादार म्हणून काम करतात. हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरीमुळे 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेहांची ओळख पटली असून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (हेही वाचा: Bhole Baba's First Responce After Stampede Incident: 'समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी'; हाथरस घटनेनंतर समोर आली फरार भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)