Bhole Baba's First Responce After Stampede Incident: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी स्वयंघोषित संत भोले बाबाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी आणि त्यामध्ये शेकडो लोकांना पाले प्राण गमवावे लागले. घडल्या घटनेबाबत प्रशासनाने कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे, तसेच चौकशीसाठी एक समितीही गठीत केली आहे. या घटनेनंतर भोले बाबा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता भोले बाबाने घटनेबाबत बुधवारी आपले मौन तोडले आणि चेंगराचेंगरी हा ‘षड्यंत्र’ झाल्याचा आरोप केला. अशाप्रकारे भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांबद्दल बाबाने शोक व्यक्त केला आहे. यासोबतच ही दुर्घटना होण्यापूर्वीच आपण घटनास्थळावरून निघून गेल्याचे त्याने सांगितले आहे.

बाबाने एक लेखी निवेदन जारी केले आहे. त्याने अधिकृतपणे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता एपी सिंग यांना आपले वकील म्हणून नियुक्त केले आहे. निवेदनात सुरजपाल सिंह उर्फ ​​भोले बाबा म्हणतो, ‘आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. मेळाव्यात चेंगराचेंगरी झाली तेव्हा आपण तिथे नव्हतो. चेंगराचेंगरी ‘असामाजिक’ घटकांनी घडवून आणली होती. बाबा अद्याप बेपत्ता असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. हाथरस येथील मेळाव्यात अनेक प्रोटोकॉलचे कसे उल्लंघन केले गेले याचाही तपशील समोर आला आहे. (हेही वाचा: Indian-origin Guru Raped His Devotees: भारतीय वंशाचा धर्मगुरू Rajinder Kalia चा अनेक भक्तांवर बलात्कार; यूके कोर्टाने ठोठावला 85 कोटींचा दंड)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)