Hathras Shocker: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी एका सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करून लाखोंचे दागिने पळवल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर (Chilli Powder) टाकून लाखोंचे दागिने लुटले (robbery). दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्यात दुचाकीवरून आलेल्या चोरांनी व्यापारी दुकानातून घरी जात असताना त्याला अडवले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. परिस्थितीचा फायदा घेत त्यांनी त्याच्याकडे असलेले दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. (Hyderabad Road Accident: ज्युबली हिल्स येथे ट्रॅफिक पोलिस चौकीला भरधाव बीएमडब्ल्यूची धडक, चालक घटनास्थळावरून पसार (Watch Video))

लाखोंचे दागिने पळवले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)