गुरुग्राम पोलिसांनी एका इसमास त्याच्या पत्नीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. पत्नीने मोबाईल, टीव्ही मागितल्याच्या रागातून या इसमाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने पत्नीची इतक्या क्रुरतेने हत्या केली की, तिच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरले. ही सुटकेस त्याने दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्गावरील इफ्को चौकाजवळील झुडपात फेकून दिली. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली, जेव्हा पोलिसांनी एका सुटकेसमध्ये महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला. महिलेच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. तिच्या शरीराचे तुकडेही करण्यात आले होत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)