सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींनी कायम आपण करत असलेल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती आणि त्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला असावा, जेणेकरून जाहिरातीत त्या उत्पादनाविषयी केले जाणारे दावे खरे आहेत,याची सत्यता त्यांना पडताळून बघता येईल. तसेच ही उत्पादने किंवा सेवा, या व्यक्तींनी स्वतः वापरुन बघाव्यात, अशा सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आल्या आहेत.

शेवटी, अशा जाहिरातींमधून कोणतीही उत्पादने किंवा सेवांची भलामण करतांना ग्राहकांची आणि आपल्या प्रेक्षकांची त्यांनी दिशाभूल करु नये, त्या नियम कायद्यावर आधारित असाव्यात असा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे. सर्व सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्तींना ह्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, आपल्या प्रेक्षक वर्गासमोर पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)