साधारण 90 च्या दशकातील दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर पत्रकारिता विश्वावर शोककळा पसरली आहे. गीतांजली अय्यर यांचे बुधवार, 7 जून रोजी निधन झाले. गीतांजली या इंग्रजी बातम्यांच्या वृत्तनिवेदिका होत्या. 1971 मध्ये त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यांच्या तीन दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकर पर्सनचा पुरस्कार पटकावला होता. गीतांजली यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे. (हेही वाचा: Woman Devotee Dies at Vemulawada Temple: वेमुलवाडा मंदिरात महिला भाविकाचा मृत्यू, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)