Woman Devotee Dies at Vemulawada Temple: वेमुलवाडा मंदिरात महिला भाविकाचा मृत्यू, Watch Video
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Woman Devotee Dies at Vemulawada Temple: वेमुलवाडा (Vemulawada) येथील श्री राजराजेश्वर स्वामी मंदिराच्या (Sri Rajarajeshwara Swamy Temple) आवारात मंगळवारी सकाळी एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांसह मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपलेली लक्ष्मी सकाळी मृतावस्थेत आढळून आली असून, तिचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

करीमनगर जिल्ह्यातील मानकोंडूर मंडलातील लिंगापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या लक्ष्मी सोमवारी तिच्या कुटुंबीयांसह मंदिरात गेल्या होत्या. प्रचंड गर्दीमुळे त्यांना आराध्य दैवताचे दर्शन घेता आले नाही म्हणून ते रात्री मंदिराबाहेर उघड्यावर झोपले. (हेही वाचा - Odisha Train Tragedy Developments: ओडिशा रेल्वे दुर्घटना, मृतदेहांची ओळख, CBI तपास आणि जखमींवरील उपचार; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी)

मंगळवारी सकाळी घरच्यांना जाग आली तेव्हा त्यांना लक्ष्मी मृतावस्थेत आढळली. वेमुलवाडा मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूची पुष्टी केली. हृदयविकाराच्या झटक्याने लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.