सरकारने 14 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर बंदी घातली आहे. म्हणजेच मल्टिपल कॉम्बिनेशन असलेली ही औषधे यापुढे बाजारात विकली जाणार नाहीत. यात ताप, अंगदुखी यांच्यावरील सामान्य औषधांचा समावेश आहे, जी मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. ही बंदी तातडीने लागू करण्यात आली आहे. सरकारने शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी केली होती. या औषधांमध्ये संभाव्य आरोग्य जोखीम आणि उपचारात्मक प्रासंगिकतेचा अभाव असल्याने सरकारने त्यांच्यावर बंदी घातली आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन्सना 'कॉकटेल' औषधे देखील म्हणतात. ही अशी औषधे आहेत जी एकाच गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र करतात. म्हणजेच एफडीसीमध्ये ठराविक प्रमाणात दोन किंवा तीन रसायनांचे मिश्रण असते. अधिसूचनेनुसार, तज्ञ समितीने सांगितले आहे की, एफडीसीद्वारे मानवांना धोका असू शकतो. त्यामुळे मोठ्या सार्वजनिक हितासाठी, या एफडीसीचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. (हेही वाचा: Chicken खाण्याचे शौकीन असाल तर वेळीच व्हा सावध; होऊ शकतो जगातील सर्वात धोकादायक आजार, WHO ने दिला इशारा)
Govt bans 14 fixed-dose medicines for posing possible health riskshttps://t.co/NpwUqAqIb0
— All India Radio News (@airnewsalerts) June 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)