चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 15.73 टक्क्यांनी वाढून 6.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परतावा समायोजित केल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.84 लाख कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 17.33 टक्के जास्त आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाच्या तात्पुरत्या आकडेवारीत सातत्याने वाढ झाली आहे. हे संकलन चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के आहे. 10 ऑगस्टपर्यंत 69,000 कोटी रुपयांचे रिफंड जारी करण्यात आले आहेत.जे मागील वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 3.73 टक्क्यांनी जास्त आहे. (हेही वाचा: PM Modi's Tip To Investors: पीएम मोदींनी दिला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मंत्र, म्हणाले- 'सरकारी कंपन्यांत करा गुंतवणूक')
👉 Direct Tax Collections for F.Y. 2023-24 32.03% of the total Budget Estimates of Direct Taxes for F.Y. 2023-24 up to 10.08.2023
👉 ₹6.53 lakh crore gross direct tax collections with 15.73% Y-o-Y growth
👉 Direct Tax collection, net of refunds, stands at ₹5.84 lakh crore… pic.twitter.com/AO3DQ6fk0p
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)