भारतीय शेअर बाजारात आज नवा उच्चांक पाहायला मिळाला. एकूण 36 सत्रांमध्ये निफ्टीने भारतीय शेअर बाजारात विक्रम प्रस्थापीत करत तब्बल 20,000 अंकांचा टप्पा पार केला. पाठीमागील काही दिवसांपासून मार्गेट ग्रीन झोनमध्ये दिसत होते. कोरोना काळात मार्केटने उसळी घेतल्यानंतर काही काळ मार्केट खाली आले. दरम्यान, मार्केटने पुन्हा एकाद करेक्शन केल्यानंतर मार्केट आता सतत बुलीश ट्रेन्ड करते आहे. अभ्यासकांनी म्हटले आहे की, मार्केटने जर 20,000 अंकांची पातळी गाठली तर मार्केटचा हा ट्रेड दिवाळीर्यंत आणि अपवादात्मक स्थितीमध्ये दिवाळी नंतरही कायम राहू शकतो. भारतीय गुंतवणुकीस वातावरण पोषक राहिल्यास येणारा काळ शेअर बाजारासाठी चांगला ठरण्याची शक्यता आहे.
ट्विट
Bulls Charge Ahead: Nifty Hits Record High, Crosses Earlier High In 36 Sessions. Nifty Hits 20,000!
WATCH 👇https://t.co/Q9GKUZk2IR#stockmarketupdates #sensex #nifty #stockmarketupdates #cnbctv18 #businessnews
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)