कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर मोठी खबळ पसरली आहे. या आरोपांना येदियुरप्पांनी खोटं असल्याचं म्हटलं आहे. 'एक महिला तिच्या लेकीसह आपल्या घरी आली होती. तिची तक्रार ऐकून आपण पोलिस कमिशनरला फोन लावला आणि तिला मदत करण्यास सांगितलं पण ही महिला आपल्या विरूद्ध बोलू लागली आहे.  पोलिस कमिशनरला याबद्दल माहिती दिली आहे. पुढे काय होते ते बघू पण आत्ताच यामागे काही राजकीय खेळी असू शकते का? हे सांगू शकत नसल्याचं' ते म्हणाले आहेत. दरम्यान पोक्सो अंतर्गत येदियुरप्पांवर गुन्हा दाखल आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)