बंगळुरूमध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका 31 वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून आपले जीवन संपवले. वीररार्जुन विजय असे मृताचे नाव असून तो मुळचा आंध्र प्रदेशचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीगेहल्ली येथील साई गार्डन अपार्टमेंटमधील वीररार्जुन याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दरवाजा तोडला असता सदस्यांचे मृतदेह आढळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी वीररार्जुनने आपली पत्नी हेमावती वय 29, आणि दोन मुली- एक दीड वर्षांची आणि दुसरी आठ महिन्यांची यांची हत्या केली. ही घटना 31 जुलै रोजी घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. माहितीनुसार या जोडप्याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घडलेल्या घटनेमागे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. या घटनेशी संबंधित सविस्तर माहिती अद्याप येणे बाकी आहे. (हेही वाचा: Kolkata: महिलेने 21 दिवसांचे बाळ 4 लाखांना विकले, पोलिसांकडून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)