Visakhapatnam: विशाखापट्टणम येथील रामा कृष्णा बीच (Rama Krishna Beach) येथे ईस्टर्न नेव्हल कमांडच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकेच्या तालीम दरम्यान छोटी दुर्घटना घडली. पॅराशूट अडकल्याने गुरुवारी दोन भारतीय नौदलाचे अधिकारी(Navy Officers)समुद्रात पडले. थोडक्यात त्यांचा जीव बचावला. एका अधिकाऱ्याने खाली उतरताना राष्ट्रध्वज हातात घेतल्याने ही घटना घडली. उतरताना नियंत्रण न ठेवल्याने दोन्ही अधिकारी पाण्यात पडले. जवळच उभ्या असलेल्या नौदलाच्या बचाव बोटीने त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आणले. या घटने व्हिडिओ कैद करण्यात आला. ज्यामध्ये अधिकारी समुद्रात धडकण्यापूर्वी फ्री फॉलमध्ये दिसत आहेत. सुदैवाने कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही. रिहर्सल पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांसमोर हा अपघात झाला. भविष्यातील प्रात्यक्षिकांमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नौदल या घटनेचा तपास करत आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांचा थोडक्यात बचावला जीव
The Indian Navy MARCOS are fine. They did not collide; instead, the parachutes had become entangled. The rescue boats were nearby and reached the location where they had fallen.#Vizag pic.twitter.com/SRoKqJplhV
— Akash Sharma (@kaidensharmaa) January 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)