Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दहावा सामना रविवारी 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पहिला सामना जिंकला. तर, सनरायझर्स हैदराबादने दोन सामने खेळले आहेत. त्यांनी एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघात परतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to bat first against @DelhiCapitals in Match 1⃣0⃣
Updates ▶️ https://t.co/L4vEDKyVsb#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/VuIzoiYCjf
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)