Fire In Perfume Factory in Himachal: हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एका कॉस्मेटिक फॅक्टरीत आग (Fire) लागली. प्राप्त माहितीनुसार, येथील कारखान्यात 15-20 कामगार अडकले आहेत. आगीनंतरचे व्हिडिओ समोर आले आहेत. राज्यातील औद्योगिक शहर असलेल्या बड्डीच्या झाडामाजरी येथे ही घटना घडली. येथील कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार अडकले आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या बड्डी आणि नालागडच्या पाच-सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीम मदत आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

आग लागल्यानंतर या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक कारखान्याच्या बाहेर धावताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये फॅक्टरीच्या छतावर एक महिला अडकल्याचे दिसत आहे. (हेही वाचा - Bengaluru: बेंगळुरूमध्ये बसने स्कूटरला धडक दिल्याने 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा मृत्यू)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)