Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Bengaluru: बेंगळुरू येथील एका 21 वर्षीय विद्यार्थिनीला शुक्रवारी बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (Bengaluru Metropolitan Transport Corporation, BMTC) बसने धडक दिली. कुसुमिता (Kusumitha) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. अपघाताच्या वेळी ती दुचाकीवरून मल्लेश्वरम परिसरातील महाविद्यालयाकडे जात होती. हा अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चालकावर कारवाई झाली की नाही, याबाबत माहिती मिळाली नाही. कुसुमिता शहरातील एका खासगी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. (हेही वाचा - Karnataka Shocker: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले; पोलिसांकडून सुटका, म्हैसूरमधील धक्कादायक घटना)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या राजाजीनगर भागातील हरिश्चंद्र घाटाजवळ स्कूटरवरून जात असलेल्या कुसुमिताला बसने धडक दिल्याने ही घटना घडली. वाटसरूंनी कुसुमिताला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Tamil Nadu Shocker: बहिणीची हत्या करून तिच्या प्रियकराचा केला शिरच्छेद, आईचाही हात कापला; तामिळनाडूमधील ऑनर किलिंगची धक्कादायक घटना)

अपघातानंतर बीएमटीसी बसचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. बस चालकाच्या भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. मल्लेश्वरम वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.