Hyderabad: तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली (Mahmood Ali) हे प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमादरम्यान अचानक बेशुद्ध झाले. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्याला उचलले आणि रुग्णालयात दाखल केलं. महमूद अली हे केसीआर यांच्या पक्ष बीआरएसचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महमूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती. तेलंगणाचे गृहमंत्री असताना त्यांनी महिलांबाबत वक्तव्य केले होते. यावरून बराच वाद झाला होता.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Hyderabad: Former Telangana Deputy CM Mahmood Ali faints during #RepublicDay2024 celebrations at Telangana Bhawan. pic.twitter.com/GCzoMb9l8U
— ANI (@ANI) January 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)