Delhi Fire: दिल्लीतील कृष्णा नगर येथील बॅंक ऑफ इंडियाजवळ असलेल्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर आणखी काही लोक जखमी झाले. चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना ही आग लागली. ही आग काही वेळातच, पहिल्या मजल्यावर पसरली. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशनम दलाच्या जवांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवला. जवांनानी 12 जणांना आगीतून बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- दिल्लीत मोठी दुर्घटना, न्यू बॉर्न बेबी केअर रुग्णालयाला आग लागल्याने सहा शिशूंचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)