Delhi Shocker: दिल्लीच्या पश्चिम भागातील पंजाबी बाग परिसरात रविवारी पंजाबचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांच्या घरासमोर अज्ञांतानी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेचा एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. असं अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी या आरोपींना शोधण्यास सुरुवात केली आहे. रविवारी संध्याकाळी 6.45 च्या सुमारास गोळीबार केल्याची माहिती मिळाली. या गोळीबारात कोणाला दुखापत झाली नाही.हवेत गोळीबार करून अज्ञात घटनास्थळीवरून फरार झाले. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हेगारांना शोधण्यासाठी पथके नेमली आहे. (हेही वाचा- दुचाकीवर स्टंट करताना तरुणाचा अपघात,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)