मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कोब्रा सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कोब्रा साप कोणत्याही जंगलात नसून घराच्या टॉयलेटच्या कमोडमध्ये सापडला होता. हे पाहिल्यानंतर घरातील सदस्य भयभीत झाले आहेत. याची माहिती सर्पमित्र व्यक्तीला देण्यात आली. त्यानंतर नागाची सुटका करून जंगलात सोडण्यात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 6 फूट लांबीचा धोकादायक किंग कोब्रा साप कमोडमध्ये लपलेला दिसत आहे. सापाला पाहिल्यानंतर स्नॅक कॅचरने घटनास्थळ गाठून त्याला बाहेर काढण्यासाठी पाईपमधून पाणी टाकल्यानंतर एका बाजूने त्याला पकडण्यात यश आले.
पाहा व्हिडिओ -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)