Centipede in Amul Ice Cream Tub: नोएडा येथील एका महिलेला ब्लिंकिटवर ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीम टबमध्ये गोम(Centipede) आढळली आहे. त्याचा व्हिडिओ महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपा देवी नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली. त्यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या मुलाला मॅन्गो शेक बनवून देण्यासाठी अमूनचे व्हॅनिला मॅजिक आइस्क्रीमचा( Amul Ice Cream) टब ऑर्डर केला होता. मात्र, तो उघडताच त्यांना त्यात मृत गोम आढळली. उत्तर प्रदेशातील नोएडामधील सेक्टर १२ मध्ये ही घटना घडली. दीपा यांनी याप्रकरणी ब्लिंकिटकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ब्लिंकिटने त्यांना त्यांच्या आईस्क्रीमचे 195 रूपये परत केले आहेत. (हेही वाचा:मोठी बातमी! ऑनलाईन मागवलेल्या Yummo Ice Cream कोनमध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा; मालाडमधील घटना)
आईस्क्रीम टबमध्ये आढळली गोम -
After a cut finger in ice cream, a centipede was found in Amul Ice Cream in Noida, watch @Amul_Coop @letsblinkit @UNWFP_India #noida pic.twitter.com/Mc5cm7rb6O
— Jyoti Karki (@Jyoti_karki_) June 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)