West Bengal : पश्चिम बंगालमधील माटीगारा परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. बंदची घोषणेनंतर पुढचे १२ तास परिसरात बंद पाळण्यात येणार आहे. त्याला स्थानिक दुकानदरांचाही चांगला प्रतिसाद पहायला मिळत आहे. रविवारी भाजपचे बूथ अध्यक्ष नंद किशोर (Booth president Nand Kishore) यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर 'जय श्री राम' (Jai Shri Ram) म्हणण्यावरून हल्ला करण्यात आला. जवळपास 15 भाजप (BJP)कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या सिलीगुडी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप भाजप नेते मिथुन प्रामाणिक यांनी केला आहे.  (हेही वाचा:Lok Sabha Election 2024: 400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही - अमित शाह )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)