यूपी विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) भाजपने (BJP) पहिली यादी (First List) जाहीर केली आहे. भाजप नेते धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी ही यादी जाहीर केली. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की उत्तर प्रदेश आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी भाजपने 57 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने दुसऱ्या टप्प्यातील 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकूण भाजपने आज 105 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)