Minister Rajkumar Anand Resigns From AAP: दिल्ली सरकारमधले मंत्री राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP)ला मोठा धक्का दिला आहे. मंत्री राजकुमार आनंद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडल्यानंतर ते म्हणाले की, केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडली आहे. पक्षात दलित समुदायाला चांगली वागणूक दिली जात नाही. आता ते या पक्षात राहू शकत नाहीत. त्याशिवाय, मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार आनंद भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. (हेही वाचा :AAP DP Campaign: आम आदमी पक्षाचे 'डीपी कॅम्पेन'; मोदी विरोधकांना डीपी बदलण्याचं केलं आवाहन )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)