दिल्ली विधानसभा निवडणुकीत सध्या भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. चालू असलेली मतांची मोजणी आणि ट्रेंड्स पाहता सध्याच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्याचे दिसत आहेत. भाजपने 6 जागांवर विजय मिळवत 42 जागांवर आघाडी घेतली आहे. आप 6 जागांवर विजयी व 16 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी 36 हा बहुमताचा आकडा आहे. अशात जवळजवळ 27 भाजपा दिल्लीत सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाचे प्रवेश वर्मा यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच, आपचे नेते मनीष सिसोदिया यांनाही जंगपूरा मतदारसंघात भाजपाच्या तर्विंदर सिंग मारवाह यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाच्या या विजयामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे, कारण 1998 पासून भाजपाला येथे सत्ता मिळालेली नव्हती. (हेही वाचा: Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ)
Delhi Assembly Election Result 2025:
#ResultsWithTOI | BJP workers celebrate outside party office as BJP set to form government in #Delhi after more than two decades
Track LIVE updates 🔗 https://t.co/aQAen6zDPQ
📸Piyal Bhattacharjee/TOI #ElectionsWithTOI #DelhiElection2025 #DelhiElectionResults… pic.twitter.com/t4bDr4QROg
— The Times Of India (@timesofindia) February 8, 2025
#DelhiAssemblyElection2025 | BJP wins 6 seats, leading on 42 seats
AAP wins 6 seats, leading on 16 seats
36 is the majority mark to form the government in Delhi pic.twitter.com/ZLnIKp62EB
— ANI (@ANI) February 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)