जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना कुपवाडा येथील जुमागुंड गावातून काही दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली. त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)