Naxalites Killed In Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत किमान तीन नक्षलवादी ठार झाले. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या जंगली भागात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी कारवाई केली असता ही चकमक सुरू झाली. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि जिल्हा दलाचे कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. गोळीबार थांबल्यानंतर, अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून 'गणवेश' परिधान केलेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह, स्वयंचलित शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू असल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार -
3 Maoists Killed In Encounter With Security Forces In Chhattisgarh's Bijapur https://t.co/NozkvzkTa8 pic.twitter.com/A9eYo9eD4A
— NDTV (@ndtv) January 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)