राम नगरी अयोध्येत (Ayodhya) बुधवारी दीपोत्सव 2021 च्या मार्फत एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य दीपोत्सव कार्यक्रमा सुरूवात झाली आहे. बुधवारी अयोध्येत 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात येईल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम त्यांची मोजणी करेल. 12 लाख दिव्यांपैकी 9 लाख दिवे रामाच्या चरणी आणि उर्वरित अयोध्येत 3 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आस्था के दिव्य प्रकाश से जगमग अयोध्या...#Deepotsav2021 #Ayodhya@NeelkanthAd @UPGovt @MinOfCultureGoI pic.twitter.com/agSz9c0KeF
— UP Tourism (@uptourismgov) November 2, 2021
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 मध्ये अयोध्यामध्ये दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. प्रथम सुमारे 1,80,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्याचप्रमाणे 2018 मध्ये 3,01,152, नंतर 2019 मध्ये 5,50,000 आणि 2020 मध्ये 5,51000. आता 2021 हे योगी सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे.
प्रदेशवासियों को दीपावली की हार्दिक बधाई। मेरी सभी जनप्रतिनिधियों से अपील हैं कि वे सब एक-एक घर को अपनाएं और उन घरों में दीप जलाने और मिठाई प्रदान करने में अपना योगदान दें, उन परिवारों के बच्चों को भी दीपावली का उपहार दें: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लखनऊ pic.twitter.com/oGwgLv5fH8
— ANI_HindiNews (@AHindinews) November 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)