राखी सावंतचा माजी पती आदिल दुर्रानी याने पुन्हा लग्न केले आहे. अहवालानुसार त्याने जयपूरमध्ये 'बिग बॉस 12' फेम सोमी खानशी लग्न केले. या जोडप्याने अद्याप ही बातमी सार्वजनिक केलेली नाही. सोमी आणि आदिल लवकरच मुंबईत परतणार असून मीडियाशी बोलणार आहेत. Etimes च्या एका विशेष अहवालात याचा दावा केला आहे. सोमी खान तिची बहीण सबा खानसोबत 'बिग बॉस12' चा भाग होती. त्या हंगामात, दीपिका कक्कर शोची विजेती ठरली होती. सोमी खान ही टीव्ही अभिनेत्री असून, तिने 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' सारखे शो केले आहेत.

आता राखी सावंतने आदिलच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, ती सध्या दुबईत आहे व आदिल खानने दुसरे लग्न केले आहे हे ऐकून तिला धक्काच बसला. आपला यावर विश्वासच बसत नसल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, 'हे धक्कादायक आहे. त्याने अजून घटस्फोटही घेतलेला नाही. आदिलने माझ्यापूर्वी 5-6 वेळा लग्न केले आहे. त्या मुलींनाही घटस्फोट दिला नाही.' (हेही वाचा: Karan Kundrra's Vintage Car Stolen: करण कुंद्राची विंटेज कार गेली चोरीला, सोशल मीडियावर करतोय परत करण्याची विनंती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)