Oscars 2024: लगान आणि जोधा अकबर यांसारख्या चित्रपटांचे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईजवळ कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती, त्यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झालेल्या 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यात आली. देसाई यांचा मृत्यू आत्महत्येने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, मात्र घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. स्थानिक पोलीस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, ते सर्व बाजूंचा तपास करत आहेत. लगान आणि जोधा अकबर व्यतिरिक्त, देसाई यांनी देवदास, मुन्नाभाई एमबीबीएस, हम दिल दे चुके सनम आणि प्रेम रतन धन पायो यासारख्या इतर अनेक आयकॉनिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)