प्रख्यात अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज 24 जुलै दिवशी त्यांचे निधन झाले आहे. जयंत सावरकर ठाण्याच्या एका रूग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिका ते अगदी ओटीटी माध्यमातही त्यांनी काम केले आहे. सावरकर 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते. दहा दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आज ही दुसरी दु:खद बाब समोर आली आहे.

कलाकारांची श्रद्धांजली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)