अभिनेते रविंद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात ते राहत असलेल्या घरामध्ये रविंद्र महाजनी मृताव्यस्थेमध्ये आढळले आहेत. पोलिसांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतला आणि मुंबईत राहणार्या त्यांच्या लेकाला कळवलं. दरम्यान त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच झाला असण्याचा अंदाज आहे. रविंद्र महाजनी यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एनसीपी नेते शरद पवार यांनी सहोक व्यक्त केला आहे.
पहा एकनाथ शिंदे ट्वीट
आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/blubQ0geUC
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 15, 2023
पहा शरद पवार ट्वीट
आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची… pic.twitter.com/MXr7aNagbs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 15, 2023
विनोद तावडे
रविंद्र महाजनी हे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ते त्यांचे देखणे रूप, राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महाजनी यांनी साकारलेल्या भूमिका आजही आपल्या मनावर ठसलेल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील देखण्या नायकांपैकी एक म्हणून त्यांचेच नाव आजही… pic.twitter.com/WJKJgXFx1o
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 15, 2023
सुनिल तटकरे
७०-८० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' म्हणून नावारूपाला आलेले रविंद्र महाजनी यांनी 'देवता', 'झुंज', 'मुंबईचा फौजदार', 'गोंधळात गोंधळ' अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने मराठी… pic.twitter.com/fh8esjuVFR
— Sunil Tatkare (@SunilTatkare) July 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)