Gufi Paintal Funeral In Mumbai: महाभारतात शकुनी मामाची भूमिका करणाऱ्या गुफी पेंटल यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. आज सकाळी मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेंद्र पाल यांनी गुफी पेंटलच्या मृत्यूला दुजोरा दिला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 31 मेपासून गुफीची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबई अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. आज गुफी पेंटल अनंतात विलिन झाले आहेत. (हेही वाचा - सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना, मुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)