विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन स्टारर चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले आहेत मात्र चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा अपेक्षित नसल्याचे दिसत आहे. आता निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. निर्मात्यांनी द व्हॅक्सिन वॉरसाठी एकावर एक तिकीट मोफत देण्याची ऑफर लॉन्च केली आहे. चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हा यामागचा निर्मात्यांचा उद्देश आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रविवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले – ‘मित्रांनो, आज रविवार आणि सोमवारी गांधी जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी, तुमच्या कुटुंबासह द व्हॅक्सिन वॉर पहा आणि एक तिकीट मोफत मिळवा.’ म्हणजेच द व्हॅक्सिन वॉरसाठी निर्मात्यांनी 'बाय 1 गेट वन'ची ऑफर दिली आहे. विवेकची पत्नी पल्लवी जोशीही या चित्रपटात सहनिर्माती असून ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. (हेही वाचा: Shyamchi Aai Marathi Movie: 'श्यामची आई' चित्रपट लकवरच प्रेक्षकांच्या भेटीला; साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार 'हा' चेहरा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)