बॉलीवूड स्टार सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर, अखेर मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज, मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून सोडण्यात आले. हल्ल्यानंतर 16 जानेवारीला त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो मंगळवारी दुपारी करीना कपूर खानसोबत घरी परतला. हल्ल्यामध्ये सैफला सहा जखमा झाल्या होत्या, त्यापैकी दोन खूप खोल होत्या आणि एक अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याजवळ होती. लीलावती रूग्णालयात सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने त्याच्या पाठीतील चाकूचा 2.5 इंच तुटलेला तुकडा काढून टाकला आणि आता त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
दुसरीकडे, रविवारी सैफच्या हल्लेखोराला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेहजाद हल्लेखोर 16 जानेवारीच्या पहाटे घर लुटण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता. परंतु जेव्हा अभिनेत्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. पोलिसांनी दावा केला की, शेहजाद हा बांगलादेशी नागरिक असून तो गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, पोलिसांना शेहजाद बांगलादेशसाठी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती चॅम्पियन असल्याचे आढळले. (हेही वाचा: Saif Ali Khan Attack Case मध्ये आरोपी Mohammad Shariful Islam Shehzad चा छडा लावणार्या 75 जणांच्या टीमचे Joint CP Satyanarayan Chaudhary कडून विशेष कौतुक)
Saif Ali Khan Gets Discharged From Hospital:
Actor Saif Ali Khan discharged from Lilavati hospital after five days.https://t.co/UWE2KOXtTm
— The Hindu (@the_hindu) January 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)