मुंबई मध्ये अभिनेता सैफ अली खान वर त्याच्या राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गंभीर हल्ला केला होता. त्यानंतर आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. Mohammad Shariful Islam Shehzad असं आरोपीचं नाव असून त्याने गुन्ह्याची आता कबुली दिली आहे. दरम्यान या आरोपीच्या मुसक्या आवळ्यासाठी मुंबई पोलिसांची 75 जणांची टीम काम करत होती. त्यांच्या कामगिरीचे Joint Commissioner of Police, Law and Order Satyanarayan Chaudhary यांनी कौतुक केले आहे. आज मुंबई पोलिस कमिशनर ऑफिस मध्ये त्यांना बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)